
देश-राज्यात आज दिवसभर काय घडामोडी घडल्या? वाचा एका क्लिकवर
श्रीकांत शिंदेंकडून शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक, म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी आज पुण्यात शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, २.५ वर्षात जे काम झाले नाही ते ५ महिन्यात या सरकारने केले आहे. विविध निर्णय या सरकारने घेतले. फक्त घोषणा नाही, त्याची अंबलबजावणी देखील सरकार करत आहे. २.५ वर्ष मुख्यमंत्री फक्त आपण असले पाहिजे, असं होतं. मात्र कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे उठाव झाला. यामुळे आज ५० आमदार आणि १३ खासदार आमच्या बरोबर आहेत, हा इतिहास आहे.
२.५ वर्ष आमदार, खासदार, मंत्र्यांची खंत होती म्हणून आज हे पाऊल उचलले. शेतकऱ्यांसाठी जी मदत देण्यात आली, ती कोणतेही अट न घालता देण्यात आली. आपल्या सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास देण्याचा निर्णय आपण घेताल. आज २ कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. पेट्रोल, डिझेल किंमती कमी झाल्याचंही शिंदे म्हणाले.
...तर जीभ छाटली पाहिजे, शिवरायांवरील वक्तव्यावरुन राष्ट्रवादीची संतप्त प्रतिक्रिया
प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या रूपाली पाटील यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या लाड यांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल तर तो त्यांनी माहिती करावा.
तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आज युवक काँग्रेस कडून पुण्यात लावले बॅनर
तुकाराम मुंडे यांच्या बदलीवरून राजकारण चांगलंच तापल आहे. आज युवक काँग्रेस कडून पुण्यातील टिळक चौकात तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. मुंढे यांची बदली रद्द झाली पाहिजे या मागणीसाठी काँग्रेस कडून सह्यांची मोहीम राबवण्यात येत आहे. मुंढे हे कुटुंबकल्याण संचालक चे आयुक्त तसेच, राष्ट्रीय आरोग्य अभियान चे प्रभारी म्हणून काम पाहत होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना या पदावरुन पदमुक्त करण्यात आलं आहे.
पुण्यात प्लंबिंगचे काम सुरू असताना शॉक लागून कामगाराचा मृत्यू
वारजे भागातील एका सोसायटी मध्ये प्लंबिंगचे चे काम करत होते. सोसायटी मधील एका फ्लॅटच्या भिंत फोडायचे काम सुरू असताना त्यांना अचानक शॉक लागला. त्यावेळी त्यांच्या बरोबर आणखी एक सहकारी उपस्थित होता. बनसोडे यांच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्याने त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी फडणवीसांच्या हाती गाडीची टेरींग
समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी फडणवीसांनी हाती गाडीची टेरींग घेतली आहे. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.
शिवाजी महाराज यांच्या बद्दलच्या वादग्रस्त विधाना नंतर, प्रसाद लाड यांची दिलगीरी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र प्रसाद लाड व्यक्त केली दिलगीरी केली आहे.
समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री नागपुरात दाखल
समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री नागपुरात दाखल झाले आहेत .आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह करणार आहेत.
भाजप नेत्याला इतिहासाचा विसर, पुन्हा वादग्रस्त विधान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानामुळे राज्यात गदारोळ सुरू आहे. यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. आमदाराच्या या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.