Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा आज (७ मे) पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होणार आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal

भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X'ला आदेश

Maharashtra Lok Sabha Third Phase Voter Turnout : सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 53.40% मतदानाची नोंद; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान

महाराष्ट्रात सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 53.40% मतदानाची नोंद झाली. बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे, तर कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं आहे.

  • लातूर - 55.38%

  • सांगली - 52.56%

  • बारामती - 45.68%

  • हातकणंगले - 62.18%

  • कोल्हापूर - 63.71%

  • माढा - 50.00%

  • धाराशीव - 52.78%

  • रायगड - 50.31%

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 53.75%

  • सातारा - 54.11%

  • सोलापूर - 49.17%

Lok Sabha Third Phase Voter Turnout : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशात आतापर्यंत 60.19 टक्के मतदान झालं असून, महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. देशातील सर्वात कमी मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.

  • आसाम - 74.86%

  • बिहार - 56.01%

  • छत्तीसगड - 66.87%

  • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 65.23%

  • गोवा - 72.52%

  • गुजरात - 55.22%

  • कर्नाटक - 66.05%

  • मध्य प्रदेश - 62.28%

  • महाराष्ट्र - 53.40%

  • उत्तर प्रदेश - 55.13%

  • पश्चिम बंगाल - 73.93%

Lok Sabha Voting Live updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ईव्हीएम मशीनची पूजा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

रूपाली चाकणकर
रूपाली चाकणकरeSakal

Lok Sabha Election Live Updates : ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

ईव्हीएम हॅक करण्याचं आमिष दाखवत अंबादास दानवेंकडे एका व्यक्तीने अडीच कोटींची मागणी केली होती. त्यांच्या भावाने सापळा रचत या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. एक लाखांची लाच घेत असताना मारुती ढाकणे या व्यक्तीला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Lok Sabha Voting Live Updates :  कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

कोल्हापूरच्या पद्माराजे मतदान केंद्रावर बोगस मतदानावरुन वाद झाला आहे. तर दुसरीकडे इचलकरंजीच्या कोरोची गावामध्ये मतदार यादीवरुन गोंधळ झाला आहे. उमेदवारांच्या यादीत मतदारांची नावं आहेत, मात्र निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत. त्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा येत आहे. नागरिक मात्र मतदान करण्यावर ठाम आहेत.

Raigad Lok Sabha Live Update : रायगडमध्ये मतदारांनी मतदानानंतर केलं रक्तदान..

रायगडमध्ये मतदानासाठी आलेल्या कित्येक मतदारांनी मतदानानंतर रक्तदानही केलं. मतदान केंद्राबाहेरच यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यामुळे मतदारांना एकाच दिवशी दोन श्रेष्ठ दान करण्याची संधी मिळाली. रायगडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 41.43 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Solapur Lok Sabha Live Update : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

सोलापूरमध्ये राम सातपुते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना समोर आली आहे. मतदान केंद्रावर काही वाद झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करावं लागलं.

Lok Sabha Polls 3rd Phase Voter Turnout : देशात 50.71 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

देशातील दुपारी तीन वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी (42.63%) मतदानाची नोंद झाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (63.11%) मतदानाची नोंद झाली आहे. आसाममध्ये देखील 63.08 टक्के मतदान झालं आहे.

  • आसाम - 63.08%

  • बिहार - 46.69%

  • छत्तीसगड - 58.19%

  • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 52.43%

  • गोवा - 61.39%

  • गुजरात - 47.03%

  • कर्नाटक - 54.20%

  • मध्य प्रदेश - 54.09%

  • महाराष्ट्र - 42.63%

  • उत्तर प्रदेश - 46.78%

  • पश्चिम बंगाल - 63.11%

Lok Sabha Polls 3rd Phase Voter Turnout : महाराष्ट्रात 42.63 टक्के मतदान, बारामतीमध्ये सगळ्यात कमी मतदानाची नोंद

दुपारी तीन वाजेपर्यंत महाराष्ट्रात 42.63 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यातील सगळ्यात कमी मतदान हे बारामतीमध्ये झालं आहे. बारामतीमध्ये अवघं 34.96 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक 51.51% मतदान हे कोल्हापुरात झालं आहे.

  • लातूर - 44.48%

  • सांगली - 41.30%

  • बारामती - 34.96%

  • हातकणंगले - 49.94%

  • कोल्हापूर - 51.51%

  • माढा - 39.11%

  • धाराशीव - 40.92%

  • रायगड - 41.43%

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 44.73%

  • सातारा - 43.83%

  • सोलापूर - 39.54%

Assam Lok Sabha Updates Live : आसामच्या मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी बारपेटा येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.

Sangola Lok Sabha Live Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवल्याचा धक्कादायक प्रकार सांगोल्यातून समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाला निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

Raigad Lok sabha Live Updates : पेणमधील बाळगंगा प्रकल्पगस्तांचा मतदानावर बहिष्कार

रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये असणाऱ्या बाळगंगा प्रकल्पगस्तांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आपलं पुनर्वसन झालं नसल्यामुळे या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. याप्रकरणी रायगड पोलीस अधीक्षकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला आहे.

West Bengal Lok Sabha Live Update : पश्चिम बंगालमध्ये महिलांचा मतदानावर बहिष्कार

पश्चिम बंगालच्या मालदामध्ये महिलांनी आंदोलन करत मतदानावर बहिष्कार टाकला आहे. विकासाच्या काही मुद्द्यांसाठी या महिला आंदोलन करत आहेत.

Solapur Lok Sabha Update : सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

सोलापुरातील मनगुळी आणि भैरववाडी या दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोन्ही गावांमध्ये सकाळपासून केवळ 8 जणांनी मतदान केलं आहे.

Sangola Lok Sabha Update : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

सांगोल्यात शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून दोन्ही गटातील ५ ते ६ जण जखमी झाले आहेत.

Kolhapur Lok Sabha Live Updates : वयोवृद्ध मतदाराचा रांगेतच मृत्यू

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभारलेले महादेव श्रीपती सुतार ( वय ६९, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर ) हे वृध्द चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Karnataka Lok Sabha Live Updates : मतकेंद्राबाहेर आढळले भाजपचे शेले; काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर भडकल्या

कारवार लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या खानापूर तालुक्यातील निट्टुर या गावातील मतदान केंद्राबाहेर मतदारांचे नावे शोधून देणारे भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोबत भाजपचे शेले घेऊन बसले होते. याप्रसंगी कारवार लोकसभा काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर येथे दाखल झाल्या. भाजप कार्यकर्त्यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Dharashiv Lok Sabha Voting Update : धाराशीवमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला

धाराशीवच्या पाठसावंगी गावात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 3-4 जण गंभीर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. साम टीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Lok Sabha Voting 3rd Phase Voter Turnout : देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

दुपारी एक वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशात एकूण 39.92 टक्के मतदान झालं असून, महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे आहे.

  • आसाम - 45.88%

  • बिहार - 36.69%

  • छत्तीसगड - 46.14%

  • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 39.94%

  • गोवा - 49.04%

  • गुजरात - 37.83%

  • कर्नाटक - 41.59%

  • मध्य प्रदेश - 44.67%

  • महाराष्ट्र - 31.55%

  • उत्तर प्रदेश - 38.12%

  • पश्चिम बंगाल - 49.27%

Lok Sabha Voting 3rd Phase Voter Turnout : दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 31.55 टक्के मतदानाची नोंद

दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. बारामती मतदारसंघात सगळ्यात कमी मतदानाची नोंद झाली आहे.

  • लातूर - 32.71%

  • सांगली - 29.65%

  • बारामती - 27.55%

  • हातकणंगले - 36.17%

  • कोल्हापूर - 38.42%

  • माढा - 26.61%

  • धाराशीव - 30.54%

  • रायगड - 31.34%

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 33.91%

  • सातारा - 32.78%

  • सोलापूर - 29.32%

Lok Sabha Voting Live : दोन्ही हात नसलेल्या व्यक्तीने पायाने केलं मतदान

दोन्ही हात नसलेल्या एका व्यक्तीने गुजरातमध्ये चक्क पायांनी मतदान केलं आहे. अनिकेत सोनी असं या व्यक्तीचं नाव आहे. 20 वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे या व्यक्तीने दोन्ही हात गमावले होते. मात्र तरीही त्यांनी हार मानली नाही. इतर नागरिकांना देखील मतदान करण्याचं आवाहन अनिकेतने यावेळी केलं.

Chhattisgarh Lok Sabha Live Updates : एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांनी केलं एकत्र मतदान

छत्तीसगडमधील सेमली येथे एकाच कुटुंबातील पाच पिढ्यांनी एकाच वेळी मतदान केलं आहे.

Hatkanangale Lok Sabha Live Update : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

हातकणंगलेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला आहे. धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे.

Satara Lok Sabha Live Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

साताऱ्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी मरळी येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला अधिकार आणि कर्तव्यही आहे. सर्व मतदार बंधू-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि आपली लोकशाही बळकट करण्याच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने केले आहे.

Goa Lok Sabha Updates Live : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोठंबी येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.

Baramati Lok Sabha Live : सुप्रिया सुळेंकडून दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल

सुप्रिया सुळेंनी दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. गावातील लोकांना धरणे धमकावत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Latur Lok Sabha Live Update  : लातुरातील सुनेगाव-सांगवीतील गावकऱ्यांचा मतदानाला बहिष्कार

लातूरमधील सुनेगाव-सांगवीतील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. याठिकाणी तहसीलदार गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी दाखल झाले आहेत.

Lok Sabha Election Phase 3 LIVE Updates : आमदार डॉ. विश्वजित कदमांनी बजावला मतदानाचा हक्क

माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम आणि सौ स्वप्नाली कदम यांनी आपल्या मतदानाचा हक्क सोनसळ तालुका कडेगांव येथे बजावला.

डॉ. विश्वजित कदम
डॉ. विश्वजित कदमeSakal

Sangli Lok Sabha Live Update : गोपीचंद पडळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि समाजकल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी पडळकरवाडी येथे मतदान केले.

Gujarat Lok Sabha Voting Live : गौतम अदानींनी बजावला मतदानाचा हक्क

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनीदेखील आज मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.

Lok Sabha Election 3rd Phase Voter Count : देशात 25.41 टक्के मतदानाची नोंद

देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दुसऱ्या फेरीनंतर देखील महाराष्ट्रच सर्वात मागे असल्याचं दिसत आहे. जाणून घ्या आकडेवारी..

  • आसाम - 27.34%

  • बिहार - 24.41%

  • छत्तीसगड - 29.90%

  • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 24.69%

  • गोवा - 30.94%

  • गुजरात - 24.35%

  • कर्नाटक - 24.48%

  • मध्य प्रदेश - 30.21%

  • महाराष्ट्र - 18.18%

  • उत्तर प्रदेश - 26.12%

  • पश्चिम बंगाल - 32.82%

Lok Sabha Election Voter Count till 11 AM : देशात सकाळी 11 वाजेपर्यंत 25.41 टक्के मतदानाची नोंद; महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान

सकाळी 11 वाजेपर्यंत देशात एकूण 25.41 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 18.18 टक्के मतदान झालं आहे. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झालं असून, बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालं आहे.

  • लातूर - 20.74%

  • सांगली - 16.61%

  • बारामती - 14.64%

  • हातकणंगले - 20.74%

  • कोल्हापूर - 23.77%

  • माढा - 15.11%

  • धाराशीव - 17.06%

  • रायगड - 17.18%

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 21.19%

  • सातारा - 18.94%

  • सोलापूर - 15.69%

Baramati Lok Sabha Voting Update : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

बारामती मतदारसंघात मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी दाखल झाल्या आहेत.

Lok Sabha Voting Update : पहिल्या दोन टप्प्यांनंतरच स्पष्ट झाले की निर्णायक जनादेश 'इंडिया' आघाडीला जाईल - जयराम रमेश

काँग्रेसचे सरचिटणीस कम्युनिकेशन प्रभारी जयराम रमेश म्हणाले, पहिल्या दोन टप्प्यांनंतरच स्पष्ट झाले की निर्णायक जनादेश 'इंडिया' आघाडीला जाईल. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतरही तेच दिसेल... आम्ही जिंकलो आहोत.

Lok Sabha Voting Update : मैनपुरी लोकसभा मतदारसंघात सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी केले मतदान

मैनपुरी लोकसभा मतदारसंघात सपा प्रमुख अखिलेश यादव, मैनपुरीचे विद्यमान खासदार आणि सपा उमेदवार डिंपल यादव यांनी मतदान केले. या जागेवरून भाजपने जयवीर सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

Lok Sabha Voting Update : देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे - पृथ्वीराज चव्हाण

कराड : लोकशाहीचा उत्सव दर पाच वर्षांनी साजरा होतो त्यावर एक गडद छाया यावेळी आहे. या देशात लोकशाही अस्तित्वात राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल थांबवण्यासाठी आज देशात देशातील जनता सज्ज झालेली आहे. मला खात्री आहे की जनता इंडिया आघाडीला साथ देऊन देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

Karnataka Lok Sabha Live Updates : प्रियंका जारकीहोळी यांनी बजावला मतदानाचा हक्क

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका जारकीहोळी यांनी यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला.

प्रियंका जारकीहोळी
प्रियंका जारकीहोळीeSakal

Karnataka Lok Sabha Voting Live : मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे मतदान केलं. कलबुर्गी येथे काँग्रेसचे राधाकृष्णा आणि भाजपचे उमेश जाधव यांच्यात लढत आहे.

Madha Lok Sabha Voting Update : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलं मतदान

निंभोरे ता. फलटण येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड जिजामाला नाईक निंबाळजार यांनी सकाळी साडे नऊच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला.

रणजितसिंह नाईक निंबाळकर
रणजितसिंह नाईक निंबाळकरeSakal

Madha Lok Sabha Update : रामराजे नाईक निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

फलटण येथील मुधोजी क्लब या मतदान केंद्रावर आज सकाळी पावने दहाच्या सुमारास विधान परिषद माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

रामराजे नाईक निंबाळकर
रामराजे नाईक निंबाळकरeSakal

Karnataka Lok Sabha Update : प्रल्हाद जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीय मंत्री आणि धारवाडमधील भाजप उमेदवार, प्रल्हाद जोशी यांनी हुबळी, धारवाड येथील मतदान केंद्र क्रमांक १११ वर मतदान केले. काँग्रेसने धारवाड लोकसभा मतदारसंघातून विनोद आसूती यांना उमेदवारी दिली आहे.

Goa Lok Sabha Live Update : पल्लवी धेंपे यांनी सहकुटुंब केलं मतदान

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पती श्रीनिवास धेंपे आणि कन्या गिरीजा धेंपे यांनीही मतदान केलं.

Goa Elections
Goa ElectionseSakal

Goa Lok Sabha Live Update : रमाकांत खलपांनी बजावला मतदानाचा हक्क

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रमाकांत खलप यांनी म्हापशात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.

Goa Elections
Goa ElectionseSakal

Lok Sabha Voting Update Live : आंबेगाव येथे मतदार याद्यांमध्ये गोंधळ

पुण्यातील आंबेगाव येथे मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Baramati Lok Sabha Voting : सुप्रिया सुळेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

बारामतीमधील रिमांड होम मतदार केंद्रावर सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.

Lok Sabha Voting 3rd Phase Updates : देशात कुठे किती मतदान?

सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशातील सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झालं आहे.

  • आसाम - 10.12%

  • बिहार - 10.41%

  • छत्तीसगड - 13.24%

  • दादरा-नगर हवेली आणि दमण दीव - 10.13%

  • गोवा - 13.02%

  • गुजरात - 9.87%

  • कर्नाटक - 9.45%

  • मध्य प्रदेश - 14.43%

  • महाराष्ट्र - 6.64%

  • उत्तर प्रदेश - 12.94%

  • पश्चिम बंगाल - 15.85%

Lok Sabha Voting 3rd Phase Updates : राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदानाची नोंद झाली आहे.

  • लातूर - 7.91%

  • सांगली - 5.81%

  • बारामती - 5.77%

  • हातकणंगले - 7.55%

  • कोल्हापूर - 8.04%

  • माढा - 4.99%

  • धाराशीव - 5.79%

  • रायगड - 6.84%

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 8.17%

  • सातारा - 7.00%

  • सोलापूर - 5.92%

Solapur Lok Sabha Voting : सोलापुरात ईव्हीएम बंद

सोलापुरातील पाथर्डी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडली आहे. त्यामुळे 20 मिनिटांपासून येथील मतदान प्रक्रिया थांबली आहे.

West Bengal Lok Sabha Voting Update : पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातही हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देखील हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. मुर्शिदाबाद येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या घरावर बॉम्ब हल्ला झाला आहे. याबाबत काँग्रेसने तृणमूल कार्यकर्त्यांना जबाबदार धरलं आहे. टीएमसीने हा आरोप फेटाळून लावला आहे.

Satara Lok Sabha Voting Live : खासदार श्रीनिवास पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

खासदार श्रीनिवास पाटील यांनी कराड शहरातील पालिका शाळा नंबर तीन मध्ये आज मंगळवारी सहकुटुंब मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस दिल्लीला पाठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केलं.

खासदार श्रीनिवास पाटील
खासदार श्रीनिवास पाटीलeSakal

Gujarat Lok Sabha Live Updates : अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सहकुटुंब मतदानासाठी पोहोचले आहेत. गांधीनगर येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. याठिकाणी ते स्वतः निवडणुकीसाठी उभे आहेत.

Baramati Lok Sabha Update Live : शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

शरद पवार यांनी बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.

Baramati Lok Sabha Voting Update : शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

शरद पवार हे आपल्या कुटुंबीयांसह मतदानासाठी दाखल झाले आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे.

Baramati Lok Sabha Live : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या मूळ गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व कन्या अंकिता पाटील ठाकरे, पत्नी भाग्यश्री पाटील, पुत्र राजवर्धन पाटील यानी देखील मतदानाचा हक्क बजावला.

Sangli Lok Sabha Voting Updates : सांगलीत तीन ठिकाणी उशीराने मतदान

सांगली मतदारसंघातील ३४८ मतदान केंद्रातील तीन मतदान यंत्रे बंद पडली होती. ती सुरू करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Hatkanangale Lok Sabha Voting Live : सत्यजित आबा पाटील सरूडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरूडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.

सत्यजित आबा पाटील सरूडकर
सत्यजित आबा पाटील सरूडकरeSakal

Madha Lok Sabha Live Updates : धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं मतदान

माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Baramati Lok Sabha Live Updates : राहुल कुल-कांचन कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामती : दौंडमधील राहू येथील मतदान केंद्रावर आमदार राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल यांच्यासह सकाळी सात वाजताच मतदानाचा हक्क बजावला.

Latur Lok Sabha Voting Update : रितेश-जेनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि देशमुख कुटुंबीय यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबत संपूर्ण देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.

Latur Lok Sabha Live Updates : लातूरमधील औसा येथे ईव्हीएममध्ये बिघाड

लातूरमधील औसा येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती. अखेर 45 मिनिटांनी याठिकाणी मतदान सुरू झालं आहे.

Solapur Lok Sabha Voting Update : गंगेवाडीतील मतदान पुन्हा सुरू

दक्षिण सोलापुरातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया थांबली होती. व्हीव्हीपॅट मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे मतदान थांबलं होतं. मात्र सुमारे अर्ध्या तासानंतर आता मशीन बदलून मतदान पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

Maharashtra Lok Sabha voting live : राजू शेट्टी, अर्चना पाटील, ओमराजे निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबतच, धाराशीवमधून अर्चना पाटील, ओमराजे निंबाळकर यांनीही मतदान केलं.

Satara Lok Sabha Live Update : सातारा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केलं मतदान

जिल्हा परिषद शाळा क्रमांक 23, गोडोली सातारा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी बजावला मतदानाचा हक्क.

Satara Lok Sabha
Satara Lok SabhaeSakal

Solapur Lok Sabha Voting : दक्षिण सोलापुरातील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड

दक्षिण सोलापुरातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे 15 ते 20 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया थांबली आहे.

PM Modi Cast Vote : पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अहमदाबादमधील निशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये त्यांनी मतदान केलं. यावेळी अमित शाह देखील उपस्थित होते.

Gujarat Lok Sabha LIVE Updates : पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये दाखल; मतदानाचा हक्क बजावणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानासाठी दाखल झाले आहेत. याठिकाणी अमित शाह यांनी त्यांचं स्वागत केलं.

Lok Sabha Voting 3rd Phase Update : प्रणिती शिंदे, शाहू महाराज यांनी केलं मतदान

सोलापुरातून प्रणिती शिंदे, राम सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांच्या कुटुंबाने मतदान केलं. रायगडातून आदिती तटकरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Gujarat Lok Sabha Voting Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  दाखल

अमित शाह हे अहमदाबादमधील निशन हायर सेकंडरी स्कूलमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी आज मतदान करणार आहेत.

Baramati Lok Sabha Voting Live : अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. तसंच, रोहित पवार यांनी बारामतीमध्ये मतदान केलं.

Lok Sabha Voting 3rd Phase : पंतप्रधानांनी केलं मतदानाचं आवाहन

लोकसभा निवडणुकांसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मोठ्या संख्येने लोकांनी बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज पंतप्रधान देखील मतदान करणार आहेत.

Maharashtra Lok Sabha Voting Live : अमित देशमुख, उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क

लातूरमधून अमित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत होत्या. तसंच साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

Lok Sabha Voting 3rd Phase Live : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

देशभरात ठिकठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. कित्येक उमेदवार देखील मतदानासाठी केंद्रांकडे निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हेदेखील आज मतदान करणार आहेत. अजित पवार, उदयनराजे भोसले, सुशिलकुमार शिंदे असे कित्येक नेते देखील सकाळीच मतदानासाठी बाहेर पडले आहेत.

Lok Sabha Voting LIVE : तिसऱ्या टप्प्यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये केवळ राज्यातीलच नाही तर देशातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते-पाटील, सुनिल तटकरे, नारायण राणे, प्रणिती शिंदे, छत्रपती शाहू महाराज, उदयनराजे भोसले, अमित शाह, दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे, शिवराज सिंह चौहान अशा कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

Baramati Lok Sabha Voting : बारामतीमध्ये पार पडलं मॉक व्होटिंग

राज्यातील ११ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात होईल. यापूर्वी बारामतीमधील बूथ नंबर २२२ वर मॉक व्होटिंग पार पडलं.

Lok Sabha Voting 3rd Phase Live : देशात कुठे-कुठे मतदान?

तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. यासोबतच गुजरातमध्ये २५, उत्तर प्रदेशात १०, कर्नाटकमधील १४, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाममधील ४, पश्चिम बंगालमधील ४, गोव्यातील २ आणि दादरा नगर हवेली तसंच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येकी एका जागेवर आज मतदान पार पडणार आहे.

Lok Sabha 3rd Phase : महाराष्ट्रात कुठे-कुठे मतदान?

राज्यातील बारामती, सांगली, कोल्हापूर, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, माढा, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हातकणंगले या ११ मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे.

Lok Sabha Election 2024 LIVE : मतदान केंद्रांवर तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा तिसरा टप्पा आज पार पडत आहे. यासाठी ठिकठिकाणी मतदान केंद्रावंर तयारीला वेग आला आहे. महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान पार पडणार आहे.

Maharashtra Lok Sabha phase 3 Election 2024 Voting LIVE updates : लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा आज (७ मे) पार पडत आहे. १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९३ जागांवर आज मतदान होईल. यामध्ये महाराष्ट्राच्या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होणार आहे. आजच्या मतदानाचे क्षणा-क्षणाचे अपडेट्स तुम्ही याठिकाणी वाचू शकता...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com