Latest Marathi News Live Update
esakal
पुणे: शेअर्समधील गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची ५१ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उंड्रीतील एका ५९ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित व्हॉटसॲप धारक आणि संबंधित बॅंक खातेधारकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीला काही प्रमाणात नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बॅंक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने ५१ लाख ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक केली.