गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन
महात्मा फुले मंडई स्थानक प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन
गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि मध्यवर्ती पुण्यातील गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पुणे मेट्रो कडून विशेष आवाहन
मार्गिका १ वरून प्रवास करणाऱ्या भाविकांनी पेठ भागातील गणपती दर्शनासाठी उतरायला कसबा पेठ मेट्रो स्थानकाचा वापर करावा
पेठ भागात जाण्यासाठी मार्गिका २ वरून येणाऱ्या प्रवाशांनी वनाजच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकावर उतरावे, तर रामवाडीच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी PMC (पुणे महानगरपालिका) मेट्रो स्थानकाचा वापर करावा
महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकात उतरून गर्दी करणे टाळावे; हे स्थानक मुख्यत्वे फक्त परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे