मोंथाचं संकट जरी निवळलं असलं तरी उत्तर अंदमान समुद्रात नवं वादळ घोंगावत आहे. या वादळामुळे पुन्हा एकदा पावसाला पोषक असं वातावरण निर्माण होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज रत्नागिरीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.