

Maharashtra Police Face Mob Attack in UP Confusion Leads to Assault by Locals
Esakal
एका आरोपीला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या महाराष्ट्र पोलिसांना गावकऱ्यांनी बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी रात्री जौनपूरमधील रीठी गावात घडलेल्या प्रकाराने गोंधळ उडालाय. महाराष्ट्र पोलीस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी गेले होते. पोलीस साध्या वेशात गेले असल्यानं गावकऱ्यांनी त्यांना चोर समजून पकडलं आणि बांधून ठेवलं. याबाबतचं वृत्त आज तक या वृत्तवाहिनीने दिलं आहे.