Bihar Police AK-47: पोलिस अधीक्षकांची ‘एके-४७’प्रकरणी गच्छंती; आंदोलनात हवेत गोळीबाराची सरकारची कबुली

Police Superintendent Removed Over AK47 Firing During Protest: बिहारमधील सिवान विद्यार्थी आंदोलनातील ‘एके-४७’ गोळीबारानंतर एसपी पुरणकुमार झा यांची गच्छंती; हवेत चार फैरी झाडल्याची सरकारची सर्वोच्च न्यायालयात कबुली
Police Superintendent Removed In AK47 Case Government Admits Firing During Protest Maharashtra Politics

Police Superintendent Removed In AK47 Case Government Admits Firing During Protest Maharashtra Politics

sakal

Updated on

नवी दिल्ली: बिहारमधील सिवानचे पोलिस अधीक्षक पुरणकुमार झा यांना पदावरून हटविण्यात आले आहे. जिल्ह्यात २५ जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिस शिपायाने ‘एके-४७’ रायफलचा वापर केल्याच्या आरोपांनंतर बिहार सरकारने ही कारवाई केली. आंदोलकांनी घेरल्याने पोलिस शिपायाने ‘एके-४७’मधून हवेत चार फैरी झाडल्या, अशी कबुली देतानाच या फैरी हवेत झाडण्यात आल्याचा दावा बिहार सरकारने आज केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com