तुर्तास कोणताही निर्णय घेऊ नका; SCचा विधानसभा अध्यक्षांना आदेश | Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suprime Court_ShivSena

तुर्तास कोणताही निर्णय नको; SCचा विधानसभा अध्यक्षांना आदेश

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing

नवी दिल्ली : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. त्यामुळं ही राज्याच्या राजकारणासाठी मोठी घडामोड ठरली आहे.

हेही वाचा: उबर कॅबमधील पॅनिक बटन बिनकामाचं; महिलांच्या सुरक्षेची ऐशीतैशी

कोर्टाच्या आजच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं आज स्पष्ट केलं की, हे प्रकरण संविधानिकदृष्ट्या महत्वाचं आहे, त्यामुळं त्यावर तातडीनं सुनावणी होऊ शकत नाही. उद्याही याबाबत सुनावणी होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घेऊ नये असं कोर्टानं आज सांगितलं. (Shiv Sena News)

हेही वाचा: Sri Lanka Crisis : राष्ट्रपती राजेपक्षे राजीनामा देणार असल्याचं निश्चित

दरम्यान, आजच सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी होईल असं वाटतं होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून होतं. यावर बरीच राजकीय गणितं देखील अवलंबून आहेत. (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तारही थांबल्याचं सांगितलं जात आहे. पण आजच्या दिवशी हे प्रकरण कोर्टासमोर आलं नाही. यावरुन शिवसेनेच्यावतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी कोर्टासमोर नाराजी व्यक्त केली. कारण हे गंभीर प्रकरण आहे. यावर सरन्यायाधीशांनी म्हटलं की, हे प्रकरण संविधानिकदृष्ट्या खूप महत्वाचं आहे. घटनात्मक पैलू यामध्ये आहेत. त्यामुळं तातडीनं यासाठी खंडपीठाची नियुक्ती होऊ शकलेली नाही.

Web Title: Maharashtra Political Crisis Supreme Court Assembly Speaker Should Not Take Any Decision Sc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh news
go to top