महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले..

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisisesakal
Summary

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात एकच गोंधळ निर्माण झालाय.

Maharashtra Political Crisis : शिवसेना (Shiv Sena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात एकच गोंधळ निर्माण झालाय. शिंदेंनी त्यांच्यासोबत 41 आमदार शिवसेनेचे असल्याचा दावा केल्यानं महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. त्यातच आता गुजरातमधील सुरतमार्गे आसामातील (Assam) गुवाहाटी (Guwahati) इथं पोहोचलेल्या शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचं एक धक्कादायक विधान समोर आलंय.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की, नाही हे मला माहीत नाही. इतर राज्यातील आमदारही आसाममध्ये येऊन राहू शकतात, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते पुढं म्हणाले, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकतं. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडं कोणतीही माहिती नाही, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.

Maharashtra Political Crisis
मविआतून बाहेर पडायला तयार, पण..; राऊतांची एकनाथ शिंदेंना अट

काल गुरुवारी एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात शिवसेनेचे तीन आणि अपक्ष दोन आमदार सामील झाले. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार दादाजी भुसे, आमदार संजय राठोड, आमदार रवींद्र फाटक, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि गीता जैन यांचं जोरदार स्वागत केलं. सध्या हॉटेलमध्ये शिंदे यांच्यासोबत 46 आमदार आहेत, त्यापैकी 37 शिवसेनेचे आहेत तर 9 आमदार अपक्ष असल्याचं कळतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com