Maharashtra : मंत्रीपद देतो म्हणून आमदारांची फसवणूक; आरोपी भाजपाच्या दिल्लीतल्या बड्या नेत्याच्या संपर्कात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Parliament House
मंत्रीपद देतो म्हणून आमदारांची फसवणूक; आरोपी भाजपाच्या दिल्लीतल्या बड्या नेत्याच्या संपर्कात

Maharashtra : मंत्रीपद देतो म्हणून आमदारांची फसवणूक; आरोपी भाजपाच्या दिल्लीतल्या बड्या नेत्याच्या संपर्कात

राज्यातल्या सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडींचा फायदा गुन्हेगारांनी घेतल्याचं समोर आलं आहे. या काळात आमदारांना मंत्रीपदाचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'साम'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे आरोपी दिल्लीतल्या भाजपाच्या बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याचा खुलासा झाला आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी रियाज शेख याने आमदारांसोबत कॅबिनेट मंत्र्यालाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे.पोलिसांनी आरोपीविरोधात चार्जशीट दाखल केली आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

आरोपींनी ज्या आमदारांना फोन केले ते सर्व भाजपाचे होते. आरोपींनी एका कॅबिनेट मंत्र्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नुकतेच पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींनी आपण दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात असून मंत्रीपद आमदारांना मिळवून देण्याच्या नावाखाली १०० कोटींची मागणी केली होती.