Maharashtra El Nino Effect : कमी दाबाचा पट्टा ओसरला, महाराष्ट्रात आता पावसाची प्रतिक्षा; अल निनोचा प्रभाव तीव्र होणार?

Maharashtra Rain Forecast : कमी दाबाचा पट्टा ओसरल्याने महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाचा ताजा अंदाज, पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज आणि अल निनोचा संभाव्य प्रभाव जाणून घ्या.
Maharashtra El Nino Effect Rain Forecast

Maharashtra El Nino Effect Rain Forecast

esakal

Updated on

Monsoon Update Maharashtra : कमी दाब प्रणालीची तीव्रता ओसरल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र आज (२ ऑगस्ट) रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा येथे जोरदार पावसाच्या सरींची शक्यता असून, अकोला, वाशीम, अमरावती, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com