

IMD predicts heavy rainfall
esakal
जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या सहा दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाने जून महिन्यातील पावसाची कसर भरून काढली. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यातील शेतकरी बळीराजा चिंतेत पडला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने विदर्भ, मराठवाडा आणि काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.