IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Monsoon Forecast : उकाडा आणि दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. IMD च्या अंदाजानुसार देशातील 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांत ऊन-पावसाचा खेळ दिसणार आहे.
IMD predicts heavy rainfall

IMD predicts heavy rainfall

esakal

Updated on

Maharashtra Rain Forecast: जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या सहा दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाने जून महिन्यातील पावसाची कसर भरून काढली.

मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यातील शेतकरी बळीराजा चिंतेत पडला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने विदर्भ, मराठवाडा आणि काही भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com