maharashtra SIR Extended Till August 17
easakal
राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप मतदार यादीत नाव नोंदवता न आलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मोहीम आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.