त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रात घडलं ते लाजिरवाणं - त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रात घडलं ते लाजिरवाणं - त्रिपुराचे उपमुख्यमंत्री

त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा विरोध महाराष्ट्रात करण्यात आला. त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळाले.

त्रिपुराच्या नावावर महाराष्ट्रात घडलं ते लाजिरवाणं - त्रिपुराचे उपमुख्यमंत्री

त्रिपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांचा विरोध महाराष्ट्रात करण्यात आला. त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळाले. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत शनिवारी मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. दरम्यान, या तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आता महाराष्ट्रातील काही ठिकाणी झालेल्या दगडफेकीची घटनेवर त्रिपुराचे उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच त्यांनी त्रिपुराच्या नावावर असं होणं लाजिरवाणं आहे अशा शब्दात घटनेचा निषेध केला.

जिष्णु देव वर्मा यांनी सर्व वर्गातील लोकांनी शांतता राखावी असं आवाहन केलं. तसंच त्रिपुरामध्ये एका धार्मिक समुदायावर हल्ला झाला ही अफवा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

राज्यात सध्या शांतता असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, योग्य टीका कधीही आणि कोणत्याही सरकारसाठी चांगली आहे. मात्र अशा प्रकारच्या अफवा या एक षडयंत्र आहेत. त्रिपुराच्या इतिहासावर अशा प्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाहीत असा इशारासुद्धा जिष्णु देव वर्मा यांनी दिला.

हेही वाचा: अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री

जिष्णु देव वर्मा म्हणाले की, त्रिपुरामध्ये कोणत्याही मशिदीवर हल्ला झालेला नाही. तसंच मशिद जाळलेली नाही. सोशल मीडियावर इतर देशांचे खोटे फोटो अपलोड करून त्रिपुराला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसांमध्ये त्रिपुरात दोन समुदायांमध्ये तणाव वाढला आहे. त्रिपुरात मशिदीमध्ये नुकसान केल्याच्या काही घटना घडल्या. त्याचे पडसाद शुक्रवारी महाराष्ट्रात उमटले होते. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचं नुकसान केलं होतं.

loading image
go to top