''शांतता राखा,अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात'' - गृहमंत्र्यांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip walse patil

अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री

मुंबई: त्रिपुरातील हिंसाचाराचे (Tripura violence) पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत आज मुस्लिम संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या अमरावतीत आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे.

अमरावतीतील अतिशय दुर्दैवी घटना

अमरावतीतील ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. बंदला हिंसक वळण न लावता नागरिकांनी शांतता पाळावी, समाजभान पाळावे. जो राजकीय पक्ष बंदचा आवाहन करतो. आणि त्यानंतर एक आक्रमक परिस्थिती घडते. गंभीर परिस्थिती घडतेय. अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे.असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना केले आहे. त्रिपुरातील हिंसाचाराचे (Tripura violence) पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. या आंदोलनामागे कोण दोषी आहे. कोणी कायदा हातात घेऊ नये, याची चौकशी केली जाईल असेही गृहमंत्री म्हणाले

हेही वाचा: अमरावती: दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचं हे षड्यंत्र: संजय राऊत

loading image
go to top