
निवडणूक विश्लेषक आणि लोकनीति-CSDS चे समन्वयक संजय कुमार यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीबाबत केलेल्या विवादास्पद दाव्यांसाठी माफी मागितली आहे. त्यांनी आपले जुन्या ट्विट डिलीट केले, ज्यामुळे काँग्रेसला निवडणूक आयोगावर हल्ला चढवण्याची संधी मिळाली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय कुमार यांच्या या ट्विटचा आधार घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता संजय यांच्या माफीनाम्याने काँग्रेसच्या या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे.