Cyclone Murasu Alert : आंध्रच्या किनाऱ्यावर 'मुरासू' चक्रीवादळ धडकणार; तेलंगण, ओडिशातही अलर्ट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? ताशी 110 कि.मी. वेगाने वाहणार वारे?

Cyclone Murasu Weather Update : बंगालच्या उपसागरातील मुरासू चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट असून अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
IMD Issues Yellow Alert for Eight Maharashtra Districts

IMD Issues Yellow Alert for Eight Maharashtra Districts

esakal

Updated on: 

अमरावती (आंध्र प्रदेश) : बंगालच्या उपसागरात ‘अर्णव’ नंतर लागोपाठ निर्माण झालेल्या ‘मुरासू’ या चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशला धोका आहे. चक्रीवादळामुळे आंध्रच्या किनाऱ्याजवळ ताशी १०० ते ११० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने दक्षतेचे आदेश देण्यात आले (Cyclone Murasu latest update) आहेत. आंध्र प्रदेशसह तेलंगण, ओडिशात चक्रीवादळाचा प्रभाव दिसण्यास सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...