
गुजरात: गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकरासह एका मध्यमवयीन पुरूषाची हत्या केली. त्यानंतर, स्वतःच्या मृत्यूचे नाटक करण्यासाठी तिने त्याचा मृतदेह स्वतःच्या कपड्यांमध्ये घालून तो जाळून टाकला. आरोपी महिलेने या हत्येच्या कट अजय देवगणचे प्रसिद्ध चित्रपट 'दृश्यम' आणि 'दृश्यम २' मधून पाहून रचला पण पोलिसांनी २४ तासांत हा कट उघडकीस आणला आणि महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली.