बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे ३३ केव्ही वीजवाहिनीचा धक्का लागून प्रवीण दत्तात्रेय रौंदळ (वय ३९) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घरावरील शेडची साफसफाई करत असताना हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या प्रवीण रौंदळ यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घराजवळून उच्चदाबाच्या वीजवाहिन्या गेल्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.