

MDU Shameful incident forcing women to prove menstrual cycle periods
esakal
Maharshi dayanand university viral news : महर्षी दयानंद विद्यापीठात (एमडीयू) घडलेल्या लज्जास्पद घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यापीठातील चार महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पाळीचा पुरावा सादर करण्यास भाग पाडण्यात आले. इतकेच नव्हे, तर त्यांना कपडे उतरवायला लावून सॅनिटरी पॅड तपासण्यात आले. या प्रकरणात दोन पर्यवेक्षक आणि इतर तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.