महात्मा गांधींचं आवडत गीत बीटिंग रिट्रिटमधून हटवलं!

यापूर्वीही हे गीत या कार्यक्रमातून काढून टाकण्यात आलं होतं. त्यावेळी याला मोठा विरोध झाला होता.
Beating Retreat
Beating Retreat

नवी दिल्ली : महात्मा गांधींचं आवडत गीत 'एबाइड विथ मी' (Abide With Me) दरवर्षी २९ जानेवारीला गांधीजींच्या पुण्यातिथीच्या पूर्वसंध्येला बीटिंग रिट्रिट (Beating Retreat) कार्यक्रमात वाजवलं जायचं. पण आता हे गीत या कार्यक्रमातून हटवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी सन २०२० मध्ये हे गीत हटवण्यात आलं होतं. पण याला मोठा विरोध झाल्यानंतर त्याचा पुन्हा २०२१ मध्ये समावेश करण्यात आला होता. (Mahatma Gandhi favourite hymn Abide with me dropped from Beating Retreat once again aau85)

Beating Retreat
Goa : भाजपला पुन्हा झटका; लक्ष्मीकांत पार्सेकर करणार पक्षाला रामराम

अधिकृत यादीत या गीताचा समावेश नाही

बीटिंग रिट्रिट कार्यक्रमात वाजवल्या जाणाऱ्या २६ धूनमध्ये 'एबाइट विथ मी' या गीताचा समावेश नाही. या गिताला १९५० पासून बीटिंग रिट्रिट कार्यक्रमात प्रत्येक वर्षी वाजवलं जात आहे. हे गीत हेन्री फ्रान्सिस लाइट यानं लिहिलं होतं. तसेच संगीत विल्यम हेन्री मॉन्क यांनी दिलं होतं.

विविध सैन्याचे जवान बँडवर वाजवणार धून

बीटिंग रिट्रीट कार्यक्रमाची सुरुवात सैन्याच्या बँड पथक आणि सहा धूनसह पाइप्स आणि ड्रम बँडद्वारे सुरु केलं जाईल. केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांचे बँड तीन धून वाजवतील. यानंतर हवाई दलाच्या बँडद्वारे चार धून वाजवल्या जातील. यामध्ये फ्लाइट लेफ्टनंट एल. एस. रुपचंद्र यांची एक विशेष लढाऊ धूनचा देखील समावेश असतो. यामध्ये नौदलाचा बँड चार धून वाजवतात. त्यानंतर आर्मी मिलिटरी बँड तीन धून वाजवतात. शेवटी मास्ड बँड आणखी तीन धून वाजवतात. यामध्ये कदम कदम बढाएं जा... आणि ऐ मेरे वतन के लोगो...या गितांचा समावेश आहे. या बीटिंग रिट्रिट कार्यक्रमाची सांगता बुगलर्सद्वारे सारे जहां से अच्छा...या गीतानं होते. यासंपूर्ण आयोजनात ४४ बुगलर्स, १६ तुरही आणि ७५ ढोलवादकांचा समावेश असतो.

२४ जानेवारीपासून सुरु होत होता कार्यक्रम

बीटिंग रिट्रिट हा प्रजासत्ताक दिनापासून सुमारे आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे. यापूर्वी हा २४ जानेवारीपासून सुरु व्हायचा मात्र या वर्षीपासून २३ जानेवारी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिन सोहळा सुरु होणार आहे. यंदा सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com