महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

एका सरकारी शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या पुतळ्याच्या शेजारी सिगारेटची थोटके आणि मद्याच्या बाटल्याही आढळल्या. ही शाळा उन्हाळ्याच्या सुटीमुळे सध्या बंद आहे.

बालासोर (ओडिशा) : एका सरकारी शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली आहे. या पुतळ्याच्या शेजारी सिगारेटची थोटके आणि मद्याच्या बाटल्याही आढळल्या. ही शाळा उन्हाळ्याच्या सुटीमुळे सध्या बंद आहे.

आज (ता.17) काही गावकऱ्यांनी शाळेत प्रवेश केला, त्या वेळी त्यांना ही बाब समजली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपासणी चालू आहे. सहादेव पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभ्रांशू शेखर नायक यांनी या प्रकरणाचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पुढील काही बाबी पुढील तपासात स्पष्ट होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Gandhi Statue Found Vandalised In Odisha School