Woman Ties Drunk Husband
esakal
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये मद्यविक्रीचे दुकान हटवण्याच्या मागणीसाठी महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या ८० दिवसांपासून या महिला सातत्याने आंदोलन करत आहेत. अशातच आंदोलनकर्त्या महिलांपैकी एकीचा पती दारूच्या नशेत आंदोलनस्थळी आल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी संतप्त महिलांनी त्याला वीजेच्या खांबाला बांधून ठेवल्याची घटना घडली. इतकेच नव्हे, तर महिलांनी त्याच्या तोंडाला चिकटपट्टीही लावली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याची सुटका केली. या घटनेची सध्या सामाजिक माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.