Mon, October 2, 2023

Mahua Moitra : 'गोबर रिपब्लिक'मध्ये राहता,महुआ मोईत्रा शिक्षण धोरणावर संतापल्या
'गोबर रिपब्लिक'मध्ये राहता, महुआ मोईत्रा शिक्षण धोरणावर संतापल्या
Published on : 22 October 2021, 6:02 am
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) या आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी मोदी सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (एनईपी) सडकून टीका केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, तुम्हाला माहित आहे, का तुम्ही गोबर रिपब्लिकमध्ये राहताय. जेथे राष्ट्रीय शिक्षण धोरणावर ना संसदेत ना राज्याबरोबर चर्चा झाली आहे.
मात्र शिक्षण मंत्री शिक्षण धोरणावरील शिबीरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना समजवून सांगत आहेत, असा टोला त्यांनी भारताचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लगावला.