
जेव्हापासून दूरसंचार माध्यमाचा शोध लागला तेव्हापासून प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले आहेत. यातील एक भाग म्हणजे नाविन्यपूर्ण जाहिराती. अनेकजण आपली मालमत्ता विकण्यासाठी जाहिरातीचा आधार घेतात. पण, बदलत्या काळानुसार जाहिरातींमध्येही मोठा बदल झाला आहे. पूर्वी केवळ प्रिंट आणि टीव्हीद्वारे जाहिराती दिल्या जात होत्या, परंतु आता डिजिटल प्लॅटफॉर्म देखील त्यासाठी मोठा आधार बनला आहे. पण, काहीतरी वेगळं करण्याच्या इच्छेपोटी लोक काही वेळा असं काही करतात जे खूप व्हायरल होतं.