नोटबंदीनंतरची प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त

cash seized.jpg
cash seized.jpg

नवी दिल्ली- प्राप्तिकर विभागाने बनावट बिलिंग करणाऱ्या एका टोळीच्या दिल्ली एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यातील सुमारे 42 ठिकाणी छापे टाकून 500 कोटींच्या बिलिंगचा भंडाफोड केला आहे. 'एएनआय'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, छाप्यादरम्यान एंट्री ऑपरेटर संजय जैन आणि त्याच्या लाभार्थ्यांकडून 62 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नोटबंदीनंतर दिल्ली एनसीआरमधील रोकड जप्त करण्याची ही सर्वात मोठी कारवाई आहे.  

प्राप्तिकर विभागाने दिल्ली-एनसीआरसह पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि गोव्यातील 42 ठिकाणी छापे मारले आहेत. 

प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, काही जण हे नेटवर्क चालवत होते. मंगळवारी मारलेल्या छाप्यात 2.37 कोटी रुपयांची रोकड आणि 2.89 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले होते. त्याचबरोबर 17 लॉकरही सापडले असून ते अजून उघडायचे आहेत.  

छापेमारी दरम्यान या नेटवर्कचे संपूर्ण जाळे उघडकीस आले असून अनेक कंपन्याही त्यांच्या बनावट बिलिंगचे लाभार्थी आहेत. यादरम्यान काही असे दस्तऐवज आहेत, ज्यामुळे हॉटेलमध्ये राहण्याची 500 कोटी रुपयांची नोंद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com