

esakal
Andhra Pradesh Bus Accident : आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. घाट रस्त्यावरून भाविकांना घेऊन जाणारी बस नियंत्रणाबाहे जाऊन थेट दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी तातडीने भद्रचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो, कारण अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील ही बस भद्रचलमहून अन्नावरमला जात होती. चित्तूर-मरेदुमिल्ली घाट रस्त्यावर हा अपघात झाला.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अल्लुरी जिल्ह्यातील चिंतूर मंडळातील तुलसीपाकालू घाट रोडवर झालेल्या बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तर जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी सांगितले की, अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात काल रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली जेव्हा एक खासगी ट्रॅव्हलर बस नियंत्रण गमावून चित्तूर-मरेदुमिल्ली घाट रस्त्यावर खोल दरीत कोसळली. या अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते.
बस तेलंगणातील भद्राचलमहून अन्नावरमकडे जात असताना अपघात झाला. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना भद्राचलम एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.