Jharkhand: बस नदीत कोसळून 7 ठार, 45 जखमी; PM मोदींनी व्यक्त केला शोक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Jharkhand: बस नदीत कोसळून 7 ठार, 45 जखमी; PM मोदींनी व्यक्त केला शोक

झारखंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किर्तनाला जाणाऱ्या लोकांनी भरलेल्या बसवरचे नियंत्र सुटल्याने बस नदीत पलटी झाली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे 45 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल होत, मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. अंधारामुळे लोकांना नदीतून बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी उशिरा हा भीषण अपघात झाला. 52 प्रवाशांना घेऊन गिरडीहहून रांचीला जाणारी बस अनियंत्रित होऊन नदीत पलटी झाली. अपघातात जखमी झालेल्या 45 जणांना हजारीबाग येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना अथक प्रयत्नानंतर बसमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक रांचीच्या किर्तन कार्यक्रमासाठी जात होते. त्यादरम्यान, हा अपघात झाला.

अपघात ग्रस्त बसमध्ये अडकलेल्या जखमींना गॅस कटरच्या सहाय्याने बस कापून बाहेर काढण्यात आले आहे. या गाडीत अनेक लोक अडकले होते. या अपघाताची माहिती मिळताच शीख समाजातील लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.