esakal | ध्वजावंदनच्या वेळी PM मोदींसोबत दिसलेल्या लष्करी महिला अधिकारी कोण माहितेय का?
sakal

बोलून बातमी शोधा

 Major Shweta Pandey,  PM Narendra Modi, 74th Independence Day

महिला लष्करी अधिकारी मेजर श्वेता पांडे यांनी मोदींना ध्वजावंदनच्या वेळी सहाय्यता केली.

ध्वजावंदनच्या वेळी PM मोदींसोबत दिसलेल्या लष्करी महिला अधिकारी कोण माहितेय का?

sakal_logo
By
सुशांत जाधव

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 74 व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मोदींनी सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजावंदन केले. लष्करी महिला अधिकारी मेजर श्वेता पांडे यांनी ध्वजावंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची साहय्यता केल्याचे पाहायला मिळाले.   

कोण आहेत फ्लॅग-ऑफिसर मेजर श्वेता पांडे

ध्वजावंदन समारंभाच्या वेळी लष्करी महिला  अधिकाऱ्याला मोठा सन्मान मिळाल्याचे पाहायला मिळाले. भूदलाच्या लष्करी महिला  अधिकारी मेजर श्वेता पांडे यांनी मोदींनी ध्वजावंदन  वेळी सहाय्यता केली.  श्वेता पांडे 2012 मध्ये लष्करात सहभागी झाल्या. लखनऊमधील सिटी मांटेसरी स्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. कंम्पुटर सायन्समध्ये त्यांनी बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे.  

 74th independence day : मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

यंदाच्या वर्षी मास्कोमध्ये विजय दिवस परेडमध्ये देखील श्वेता पांडे या भारतीय सैन्य तुकडीच्या हिस्सा होत्या. मेजर श्वेता पांडे भारतीय सेनेच्या 505 बेस वर्कशॉप विभागात ईएमई म्हणजेच इलेक्ट्रोनिक आणि मॅकेनिकल इंजीनियरिंग कोरच्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. 233 फील्ड बॅटरी (सेरेमोनियल)तोफ चालवणाऱ्या जवानांनी 21 तोफांची सलामी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजावंदन केले. सेरेमोनियल बॅटरीची धूरा लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिंह मेहता आणि गन पोजिशन ऑफिसर नायब सूबेदार (एआयजी) अनिल चंद यांनी सांभाळली. 
 

loading image
go to top