

IIT Kanpur researchers uncover deepfake network of over 50 fake videos using AI technology.
esakal
कानपूर आयआयटीच्या (IIT Kanpur) शास्त्रज्ञांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एका आईला आणि तिच्या दोन मुलींना मोठा न्याय मिळवून दिला आहे. डीपफेक (Deepfake) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले ५० हून अधिक अश्लील व्हिडिओ बनावट असल्याचे पुराव्यासह सिद्ध झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक तपासामुळे एका कुटुंबाची बदनामी टळली असून अलाहाबाद उच्च न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावली आहे.