

Attack Plan Targeting Major Cities Uncovered; Nine Suspects Held
sakal
नवी दिल्ली : दिल्लीसह मुंबई आणि देशातील अन्य संवेदनशील ठिकाणी हल्ल्याचा कट रचणाऱ्या नऊ जणांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. हे सर्व जण पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील व्यक्तींचा समावेश असून काही विदेशी नागरिकांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.