मोदी म्हणाले, 'त्यांची' यादी बनवा

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

''तुम्ही अशा लोकांची यादी तयार करा, ज्यांनी जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविण्याला विरोध केला''. 

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर विविध निर्णय घेतले आहेत. त्यांच्या सरकारने कलम 370 नुकतेच हटविले. त्यानंतर आता मोदींनी सांगितले, की ''तुम्ही अशा लोकांची यादी तयार करा, ज्यांनी जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविण्याला विरोध केला''. 

पंतप्रधान मोदी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, ''तुम्ही अशा लोकांची यादी तयार करा, ज्यांनी जम्मू काश्मीरातील कलम 370 हटविण्याला विरोध केला. या यादीत तुम्हाला स्वार्थी राजकीय नेते, दहशतवाद्यांप्रती सहानुभूती दाखविणारी लोकं आणि विरोधी पक्षातील काही नेते दिसतील''.

तसेच देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही राजकीय विचारधारेशी जोडलेला असो. प्रत्येक जण केंद्र सरकारने जम्मू काश्मीर, लडाखबाबत घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करत आहे, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a list of them who oppose Article 370 says Narendra Modi