नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्र सादर केले आहे. यामध्ये आयोगाने असा दावा केलाय की, फॉर्म 17C नुसार मतदानाची आकडेवारी उघड करण्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. फॉर्म 17C नुसार प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता येते. यामध्ये पोस्टद्वारे केलेल्या मतदानाचा देखील समावेश असतो.
प्रत्येक मतदान केंद्रावरील अंतिम अधिकृत डेटा जाहीर करा, कारण तो कायदेशीर अधिकार आहे, असा दावा कोणाला करता येणार नाही, असंही निवडणूक आयोगाने शपथपत्रात स्पष्ट केलं आहे. फॉर्म 17C वेबसाईटवर अपलोड करणे योग्य ठरणार नाही. कारण, या फोटोंचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये अस्वस्थता आणि अविश्वास निर्माण होईल, असंही आयोगाने म्हटलंय.
निवडणूक निकालामध्ये खूप कमी मतांनी एखाद्याचा विजय होऊ शकतो. अशा स्थितीमध्ये फॉर्म 17 ची माहिती उघड केल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. कारण, फॉर्म 17 मध्ये पोस्टाद्वारे केलेल्या मताचा देखील समावेश असतो. त्यामुळे यातील फरक लोकांच्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे एखादा व्यक्ती चुकीच्या हेतूने याचा मोठा मुद्दा करु शकतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
फॉर्म 17 हा केवळ पोलिंग प्रतिनिधीला देता येऊ शकतो, सर्वांना तो द्यायचा असा नियम नाही. फॉर्म 17 अंतर्गत मतदानाची आकडेवारी उघड करणे नियमानुसार नाही, असं देखील आयोगाने म्हटलंय. डेमोक्रेकिट रिफॉर्म या एनजीओने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करत सर्व मतदान केंद्रावरील अधिकृत माहिती उघड करण्याची मागणी केली होती. ४८ तासाच्या आत ही माहिती दिली जावी अशीही मागणी करण्यात आली होती. यावर निवडणूक आयोगाने हे शपथपत्र सादर केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.