Video: लॉकडाऊनचा परिणाम; रोटीची अवस्था पाहा...

वृत्तसंस्था
Monday, 12 October 2020

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले होते. आता पुन्हा हळूहळू सर्व सुरू होत आहे. एका हॉटेलमध्ये रोटी बनवत असताना अंदाज चुकला आणि रोटी पंख्यावर जाऊन पडली.

नवी दिल्लीः जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले होते. आता पुन्हा हळूहळू सर्व सुरू होत आहे. एका हॉटेलमध्ये रोटी बनवत असताना अंदाज चुकला आणि रोटी पंख्यावर जाऊन पडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये...

एका हॉटेलमध्ये शेफ रोटी तयार करत होता. पण, त्याचा अंदाज चुकल्यामुळे रोटी थेट पंख्यावर जाऊन पडली. नेटिझन्सनी शेफच्या अंदाजाचा लॉकडानशी संबंध जोडला आहे. लॉकडाऊनमध्ये कामाची सवय सुटल्यामुळे रोटी बनवतानाही अंदाज चुकला आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून देत आहेत. पण, हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याबाबत माहिती मिळू शकली नसली तरी नेटिझन्स व्हिडिओ पाहून व्यक्त होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: making of roti funny video viral on social media