कोरोनाची लागण होण्यात पुरुषांची संख्या जास्त; पॉझिटिव्हिटी रेट झाला कमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 October 2020

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मंगळवारी पत्रकार परिषद झाली.

नवी दिल्ली- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मंगळवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. कोरोनातून आतापर्यंत 62 लाखांपेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. तसेच संक्रमण दर 6.24 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात संक्रमण दर 5.16 टक्के राहिला. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 9 लाखांपेक्षा कमी आहे, असं भूषण यांनी सांगितलं.  

भूषण म्हणाले की, पुढील दोन महिने आपल्याला कोरोना महामारीविरोधात आणखी ताकदीने लढावे लागणार आहे. आपण सर्वांनी मिळून या महामारीविरोधात लढल्यास विजय मिळवू शकतो. आपल्याला काही गोष्टींना अधिक महत्व द्यावे लागणार आहे. मास्क घाला, शारीरिक अंतराचे नियम पाळा, वारंवार हात धुवा.

कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्याने पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. आतापर्यंत एकूण 86.78 टक्के लोक कोरोनातून बरे झाले आहेत, तर 11.69 सक्रिय रुग्ण आहेत. मृत्यूची टक्केवारी 1.53 आहे. 10 राज्यात 79 टक्के सक्रिय रुग्ण आहेत, 3 राज्यात 50 टक्के प्रकरणे आहेत. 

चीनला लगाम घालू शकणारी 'क्वाड'; सहकार्याचा नवा चतुष्कोन

आरोग्य सचिवांनी सांगितलं की, कोरोना महामारीमुळे 70 टक्के पुरुष आणि 30 टक्के महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील 53 टक्के रुग्ण 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. 35 टक्के रुग्ण 45 ते 60 वर्ष वयाचे आहेत. 10 टक्के मृत्यू 26 ते 44 वर्ष वय असलेल्या लोकांचा झाला आहे. 18 ते 25 वर्षे वय असलेल्या 1 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. 17 वर्ष वयाच्या 1 टक्के लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

मरणाऱ्या 45 ते 60 वर्ष वयाच्या 13.9 टक्के रुग्णांमध्ये जुना आजार होता. 60 वर्षावरील मेलेल्या 24.6 टक्के रुग्णांमध्ये पूर्वीचा गंभीर आजार होता. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी 17.9 टक्के रुग्णांमध्ये पूर्वीचा गंभीर आजार होता, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Males are more likely to be infected with corona Positivity rate decreased