esakal | "जबाबदारी घेण्याऐवजी मोदींनी आरोग्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवलं"
sakal

बोलून बातमी शोधा

"जबाबदारी घेण्याऐवजी मोदींनी आरोग्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवलं"

"जबाबदारी घेण्याऐवजी मोदींनी आरोग्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवलं"

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी पेगॅसस प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ घातला आहे. त्यामुळे कामकाज सुरु झाल्यानंतर चार मिनिटाच्या आतच लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होतं. तर राज्यसभा 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती. पेगॅसस स्पायवेअरच्या तंत्रज्ञानातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह इतर राजकीय नेते आणि पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. जगभरातील 16 माध्यम संस्थांनी याबाबत दावा केला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेससह विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर भाजपने स्पष्टीकरण द्यावं, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. पेगॅसस व्यतिरिक्त कोरोनाच्या मुद्यांवर देखील विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.

हेही वाचा: शाळेत 'तक्रार पेटी' ठेवा; POSCO प्रकरणात कोर्टाचे निर्देश

राज्यसभेमधील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी कोरोना महासाथीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलंय की, झालेल्या चुकांची जबाबदारी घेण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना बळीचा बकरा बनवलं आहे. खर्गे यांनी पुढे म्हटलंय की, मी डॉक्टर्स आणि पॅरामेडीक्ससहित कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली देतो. मी त्या लोकांना सलाम करतो ज्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान 'ऑक्सिजन लंगर' चालवून दुसऱ्यांची मदत केली. मी प्लाझ्मा डोनर्सना देखील सलाम करतो. पुढे त्यांनी म्हटलंय की, नोटबंदीप्रमाणेच एका रात्रीतच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सरकारने यासंदर्भात कसलीच तयारी केली नाही. लोकांना परतण्यासाठी कोणतीही ट्रेन नव्हती. खाण्यापिण्याचा प्रश्न उपस्थित झाला. या सगळ्यासाठीच सरकार जबाबदार आहे.

हेही वाचा: नक्षलवादी ठरवला गेलेला पेगॅससच्या यादीतील पत्रकार म्हणतो, मी घाबरत नाही...

सरकारने लोकांनी मास्क परिधान करणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीत ते स्वत: काय करत होते? तुम्ही स्वत:चं बनवलेले नियम पायदळी तुडवत आहात. त्यांना कोरोना नियमावलीची पायमल्ली करण्याचं श्रेय दिलं गेलं पाहिजे. पंतप्रधान मोदींनी लोकांना मेणबत्ती लावण्याचं, भांडी बडवण्याचं आवाहन केलं. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत हे सगळं केलं. मात्र, त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं नाही. या सगळ्याचा दोष स्विकारण्याऐवजी त्यांनी आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना बळीचा बकरा बनवलं.

loading image