Mallikarjun Kharge : मोदी हे ‘खोटारड्यांचे सरदार’

‘अनेक जण कायम ‘मोदी-मोदी’अशा घोषणा देत असतात. पण मोदी हे ‘खोटारड्यांचे सरदार’ (झूठों का सरदार) आहेत,’ अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केली.
Mallikarjun Kharge
Mallikarjun Khargesakal
Updated on

जगधारी (हरियाना) - ‘अनेक जण कायम ‘मोदी-मोदी’अशा घोषणा देत असतात. पण मोदी हे ‘खोटारड्यांचे सरदार’ (झूठों का सरदार) आहेत,’ अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केली. देशातील जनता भाजपला कंटाळली असल्याचा दावाही खर्गे यांनी हरियाना येथील सभेत बोलताना केला. खर्गे यांची हरियानातील ही पहिलीच प्रचार सभा होती.

खर्गे म्हणाले, ‘भाजपला जनतेकडून राज्यघटनाच हिसकावून घ्यायची आहे. त्यांना लोकशाही नष्ट करायची आहे. त्यांच्या या कृतीला काँग्रेसचा विरोध आहे. अनेक जण वारंवार ‘मोदी मोदी’ अशा घोषणा देत असतात. पण पंतप्रधान मोदी हे तर खोटारड्यांचे सरदार आहेत. तरीही त्यांचाच जयघोष केला जातो.’

‘मला कोणाचाही अपमान करायचा नाही आणि मोदींनाही आमचा विरोध नाही. पण, मोदींच्या विचारसरणीला आमचा विरोध आहे व त्याविरोधात आम्ही लढू. काँग्रेसचा विरोध रा.स्व. संघाच्या विचारसरणीला आहे,’ असेही खर्गे यांनी केला.

मोदीजी, तुम्हाला वाटते की तुम्ही हुशार आहात. पण जनता तुमच्यापेक्षाही हुशार आहे. ते तुमच्याविरोधातच लढत आहेत.

- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com