Mallikarjun Kharge ED Investigation : मल्लिकार्जुन खर्गेंची ईडीने केली ७ तास चौकशी; जयराम रमेश म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mallikarjun Kharge and Jairam Ramesh News

ED : मल्लिकार्जुन खर्गेंची ईडीने केली ७ तास चौकशी; जयराम रमेश म्हणाले...

Mallikarjun Kharge ED Investigation नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची यंग इंडियामधील व्यवहारासंदर्भात सुमारे सात तास चौकशी केली. खर्गे यांनी संसदेच्या कामकाजादरम्यानच सरकारवर निशाणा साधला होता. ‘आमच्या नेत्याला संसदेच्या अधिवेशनादरम्यान ईडीने समन्स बजावले होते. ते आज रात्री मार्गारेट अल्वा यांच्यासाठी आयोजित ‘डिनर पार्टी’त जाणार होते’ असे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना गुरुवारी दुपारी १.३० वाजता ईडी अधिकाऱ्यांसमोर बोलावण्यात आले. खर्गे (Mallikarjun Kharge) यांना नॅशनल हेराल्ड कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यंग इंडिया लिमिटेडमधील व्यवहाराबाबत चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीची चौकशी (ED Action) संपल्यानंतर सुमारे सात तासांनी ते बाहेर आले.

आता याप्रकरणी काँग्रेसने (Congress) मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. साडेसहा तास झाले आहेत आणि आमचे ज्येष्ठ नेते आणि एलओपी मल्लिकार्जुन खर्गे यांना संसदेच्या अधिवेशनाच्या मध्यभागी ईडीने बोलावले होते. हे खेदजनक आहे. विरोधी पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यासाठी रात्री ७:३० वाजता आयोजित डिनर पार्टीत ते सहभागी होणार होते. मात्र, ईडीच्या कारवाईमुळे त्यांना सहभाग घेता आला नाही, असे पक्षाचे खासदार जयराम रमेश (Jairam Ramesh) म्हणाले.