Adani Row : "अदानींची संपत्ती ५० हजार कोटींवरून लाखो कोटींपर्यंत कशी वाढली?"

gautam adani
gautam adani
Updated on

Adani Row :   गौतम अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस पंतप्राधन नरेंद्र यांना सवाल करत आहे. विरोधकांना या प्रकरणाची संयुक्त संसदीय चौकशी हवी आहे. आजही (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. गौतम अदानी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांची संपत्ती १३ पटीने वाढली आहे का, असा सवाल करत त्यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.

एका व्यक्तीची संपत्ती अडीच वर्षात १३ पट वाढते. २०१४ मध्ये ५० करोड होती. तर २०१९ मध्ये एक लाख करोड झाली. अचानक असे काय झाले की दोन वर्षात संपत्ती लाखो करडोपर्यंत वाढली. हिंडेनबर्गचा भाजप स्विकारत नाही, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते. यावेळी अदानी मुद्द्यावर चर्चा खर्गे यांनी मोदी सरकारला खोचक सवाल केले. 

अदानींचे नाव न घेता पंतप्रधानांच्या मित्राच्या संपत्तीत अचानक अनेक पटींनी वाढ झाल्याचे खरगे म्हणाले. त्यावर उत्तर देताना सभागृह नेते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लगेचच हे आरोप कोणत्याही आधाराशिवाय केले जात असल्याचे सांगितले.

पियुष गोयल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत २०१४ मध्ये आपल्या नेत्याची संपत्ती होती आणि आज किती वाढली आहे, हे तपासा, असे म्हटले. 

gautam adani
Viral Video : मानवतेला सलाम! कशीतरी मिळवलेली भाकर भिकाऱ्याने खाऊ घातली कुत्र्याला

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, "या (अदानी) उद्योगपतीला सरकारकडून प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून त्यांना भरपूर पैसा मिळाला आहे. गुजरातमध्ये ३१ पैशांच्या थकीत कर्जामुळे एका शेतकऱ्याला ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही, मात्र उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करण्यात येत आहे. एका व्यक्तीला (अदानी)  विमानतळ, कोळसा, रस्ता, सिमेंट मिळत असून ते खरेदी करण्यासाठी सरकारी बँकांकडून पैसेही उपलब्ध होत आहेत."

gautam adani
Mahua Moitra : मी सफरचंदला सफरचंदच म्हणेन, संत्री नाही; आक्षेपार्ह वक्तव्यानंतर TMC खासदार भाजपवर भडकल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.