मोठी बातमी! मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; सोनिया गांधी म्हणाल्या, पक्षासाठी ते झोकून देऊन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mallikarjun Kharge

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं अभिनंदन केलं.

मोठी बातमी! मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आज (बुधवार) पक्षाचे नवे अध्यक्ष (Congress President) म्हणून पदभार स्वीकारला. काँग्रेस मुख्यालय 24 अकबर रोड इथं आयोजित या कार्यक्रमात सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी यांच्यासह सर्व नेते उपस्थित आहेत.

भारत जोडो यात्रेच्या तीन दिवसांच्या दिवाळी ब्रेकमध्ये 48 दिवसांनंतर प्रथमच दिल्लीत आलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारण्यापूर्वी खर्गे यांनी राजघाट इथं महात्मा गांधी, शांती वन इथं जवाहरलाल नेहरू आणि शक्तीस्थळ इथं इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली.

हेही वाचा: Asaduddin Owaisi : 'इन्शाअल्लाह, हिजाब घातलेली मुलगी एक दिवस भारताची पंतप्रधान बनेल'

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं अभिनंदन केलं. सर्वात समाधानाची बाब म्हणजे, अध्यक्षपदी निवडून आलेले हे अनुभवी आणि तळमळीचे नेते आहेत. एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी आपल्या मेहनतीनं आणि पक्षासाठी झोकून देऊन ही उंची गाठलीय, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

खर्गे म्हणाले, एका सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. सोनिया गांधींनी पक्षाची धुरा चोखपणे सांभाळली, मीही मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करेन, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: VIDEO : छठ घाटांच्या पाहणीदरम्यान नितीशकुमार जखमी; पायाला-पोटाला गंभीर दुखापत, स्वत: सांगितला सगळा प्रकार

यावेळी खर्गेंनी संघटनेतील 50 टक्के पदे 50 वर्षांखालील नेत्यांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रातील विद्यमान सरकारवर सडकून टीका केली. नवीन भारतात रोजगार नाही, देशात महागाई शिगेला पोहोचली आहे. केंद्रातील सरकार झोपले आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून लोकांना टार्गेट केले जात आहे. आजच्या राजकारणात फक्त लबाडीचे वर्चस्व आहे, अशी टीका खर्गेंनी केली.