esakal | ममतांचे 'मिशन गोवा'; TMC खासदाराने घेतली गायक लकी अलींची भेट | Goa Election
sakal

बोलून बातमी शोधा

ममतांचे 'मिशन गोवा'; TMC खासदाराने घेतली गायक लकी अलींची भेट

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेस आता मिशन गोव्याची तयारी करत आहे.

ममतांचे 'मिशन गोवा'; TMC खासदाराने घेतली गायक लकी अलींची भेट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनी सुरु केली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेस आता मिशन गोव्याची तयारी करत आहे. गोव्याच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस उतरण्याची शक्यता आहे. राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन गुरुवारी गोव्यात पोहोचले आहेत. त्यांनी गायक लकी अली आणि अभिनेत्री, कार्यकर्ता नफीसा अली यांची भेट घेतली.

तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी लकी अलींची भेट घेतल्याचे फोटो नफीसा अली यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नफीसा यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, गोव्यात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या ममता बॅनर्जींच्या निर्णय़ाने मला खूप आनंद झाला आहे. राज्याच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी झोकून देऊन हे नेते काम करतील असा विश्वासही नफीसा अली यांनी व्यक्त केला. गोव्याला तरुण आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची गरज आहे असे नफीसा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: 'मोदींनी स्वत:साठी 2 विमाने घेतली तेवढ्या किमतीत एअर इंडिया विकली'

नफीसा अली यांनी जरी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तृणमूल निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं असलं तरी डेरेक ओब्रायन यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, अशीही चर्चा आहे की, तृणमूल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारक शोधत आहे. गोव्यात असलेल्या डेरेक ओब्रायन यांनी म्हटलं की, 'फक्त राजकीय व्यक्तीच नाही तर सर्व क्षेत्रातील लोकांची आम्ही भेट घेत आहे. लोक तृणमूलच्या कामाचं कौतुक करत आहेत. तसंच लोक तृणमूलमध्ये सहभागी होत आहेत.'

गायक लकी अली हे त्यांचा बराचसा वेळ गोव्यातच असतात. त्यांची आणि डेरेक ओब्रायन यांची भेट झाल्यानं गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या निवडणुकीच्या तयारीच्या चर्चेला उत आला आहे. तृणमूल काँग्रेस गोव्यातील निवडणुकांकडे गांभीर्याने पाहत असून दुर्गा पुजेनंतर अभिषेक बॅनर्जी हेसुद्धा गोव्यात येण्याची शक्यता आहे.

loading image
go to top