esakal | 'मोदींनी स्वत:साठी 2 विमाने घेतली तेवढ्या किमतीत एअर इंडिया विकली'
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi UP

'मोदींनी स्वत:साठी 2 विमाने घेतली तेवढ्या किमतीत एअर इंडिया विकली'

sakal_logo
By
सुधीर काकडे

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेनंतर अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे. प्रियांका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये आज किसान न्याय सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा लखीमपूर प्रकरणावरून केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्य सरकार आणि केंद्रीय राज्यमंत्री त्यांच्या मुलाला संरक्षण देतायेत, त्यामुळे पीडितांच्या कुटुंबांना उत्तर प्रदेशात न्याय मिळण्याची आशा राहिलेली नाही. आज या देशात फक्त दोन प्रकारचे लोक सुरक्षित आहेत, ते म्हणजे सत्तेत असलेले भाजप नेते आणि त्यांचे अब्जाधीश मित्र अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

'देशाच्या गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने निघृणपणे आपल्या गाडीखाली ६ शेतकऱ्यांना चिरडलं, या घटनेतील सर्व पीडित परिवार म्हणतात की आम्हाला नुकसानभरपाई नको आम्हाला न्याय हवा आहे, मात्र या सरकारमध्ये आम्हाला न्याय देणारं कोणी दिसत नाही' असं वक्तव्य प्रियांका गांधी यांनी किसान न्याय सभेला संबोधित करताना केलं.

हेही वाचा: 'स्वखर्चाने घेतलीय लस; हटवा मोदींचा फोटो'; हायकोर्टात याचिका

पंतप्रधान 'उत्तम प्रदेश' आणि आजादी का अमृत महोत्सवाचं काम पाहण्यासाठी लखनऊला आले, पण पीडित कुटुंबांचे सांत्वन करण्याासाठी लखीमपूर खेरीला जाऊ शकले नाहीत. शेतकरी वर्षभरापासून आंदोलन करतायेत, या दरम्यान 600 हून अधिक शेतकरी मरण पावले. ते विरोध करतायेत कारण त्यांना माहिती आहे की, त्यांचे उत्पन्न, जमीन आणि पिकं या सरकारच्या अब्जाधीश मित्रांना जातील असंही प्रियांका गांधींनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा: पंजाब रेजिमेंटचे सैनिक शेतकऱ्यांसोबत आंदोलनात? लष्कराचे स्पष्टीकरण

पीएम मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना 'आंदोलनजीवी' आणि दहशतवादी म्हटलं. योगीजींनी त्यांना गुंड म्हटलं आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अजय कुमार मिश्रा म्हणाले की, ते आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 मिनिटात सरळ करतील. एकूणच या सर्व गोष्टींचा उल्लेख करत प्रियांका गांधी यांनी भारतीय जनता पक्षाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.

मोदीजींनी गेल्या वर्षी 16,000 कोटी रुपयांमध्ये स्वतःसाठी दोन विमाने खरेदी केली. त्यांनी या देशाची संपूर्ण एअर इंडिया या अब्जाधीश मित्रांना फक्त 18,000 कोटी रुपयांना विकली अशी टीका देखील प्रियांका गांधींनी केली.

loading image
go to top