"सरकारकडून सगळ्याचं भगवेकरण"; टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावर ममता बॅनर्जी संतापल्या, भाजपचं उत्तर

Mamata Banerjee
Mamata Banerjeeesakal
Updated on

Mamata Banerjee: टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. सर्व काही भगव्या रंगात रंगवले जात आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. यावर भाजपने देखील पलटवार केला आहे. ममतांनी संपूर्ण कोलकाता निळ्या-पांढऱ्या रंगात रंगवला असल्याची टीका भाजपने केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी विश्वचषक २०२३ फायनल खेळल्या जाणार आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी याची वाट पाहत आहे. मात्र आता नवा वाद निर्माण झाला आहे. कोलकाता येथील खसखस ​​बाजारात जगधात्री पूजेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीवर प्रश्न उपस्थित केले.

आता सर्व काही भगवे होत आहे. आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे आणि मला विश्वास आहे की ते जगज्जेते होतील. पण जेव्हा ते सराव करतात तेव्हा त्यांचा पेहरावही भगवा झालाय. पूर्वी ते निळ्या रंगाचे कपडे घालायचे. मेट्रो स्थानकांनाही भगवा रंग दिला जात आहे. प्रत्येक गोष्टीला नमोचे नाव दिले जात आहे. हे मान्य करता येणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी कोणाचेही नाव न घेता या कृत्याचा निषेध केला. अशा प्रकारची नौटंकी नेहमीच नफा मिळवू शकत नाही. सत्ता येते आणि जाते. हा देश जनतेचा आहे, फक्त एका पक्षाचा नाही, अशी टीका ममता यांनी भाजपवर केली.

Mamata Banerjee
China Drug Fentanyl : चीनच्या ड्रगमुळे अमेरिकेत 70 हजार नागरिकांचा बळी; अखेर बायडेन-जिनपिंग करणार मोठी कारवाई

ममता बॅनर्जी यांच्या आरोपावर भाजपने देखील पलटवार केला आहे." विश्वचषकात टिम इंडियाच्या इच्छेचे आम्ही स्वागत करतो. सगळीकडे भगवे झाले तर भगवा अव्वल असलेल्या तिरंग्याचे काय? सूर्याच्या पहिल्या किरणाचा रंग काय असतो? ममता म्हणतात की टिम इंडिया निळा रंग वापरण्यासाठी संघर्ष करतात. मात्र यांना हे माहित असले पाहिजे की भारत कूटनीतिक कारणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निळा वापरल्या जातो," असे भाजपच्या शिशिर बाजोरीया यांनी म्हटले आहे.

भाजप नेते राहुल सिन्हा म्हणाले, "काही दिवसांनंतर त्यांना प्रश्न पडेल की आमच्या राष्ट्रध्वजात भगवा रंग का आहे. आम्ही अशा विधानांवर प्रतिक्रिया देणे योग्य मानत नाही."

नेदरलँडचे क्रिकेटपटूही भगवा परिधान करतात, ते हिंदू राष्ट्र झाले आहे का?, असा प्रश्न देखील भाजपने उपस्थित केला आहे.

Mamata Banerjee
Rahul Gandhi: आधी मिशन तेलंगणा मग मोदीचे सरकार, विधानसभा विजयाचा राहुल गांधींना विश्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com