लालची नेत्यांमुळे दंगल होते, ममता बॅनर्जींचा भाजपवर टीका | Mamata Banerjee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee News

लालची नेत्यांमुळे दंगल होते, ममता बॅनर्जींचा भाजपवर टीका

कोलकाता : दंगल कधी हिंदू, मुसलमान आणि शीख करत नाहीत. ते तर काही लालची नेते करतात. त्यांचे डोके कचऱ्याने भरलेले असते. ती आग लावतात. हा लोकांचा दोष नाही. कारण जी लोकांना उकसवतात ती दोषी आहेत, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजप (BJP) नेत्यांवर केली. त्या कोलकात्यात बोलत होत्या. मी नमाज पठण करते असे अनेक जण माझ्याविषयी बोलतात. (Mamata Banerjee Attack On BJP Leaders For Riots In Across The Country)

हेही वाचा: सिद्धू मुसेवाला हत्याकांडात मोठा खुलासा, हत्येपूर्वी बुलेटप्रूफ वाहनाची रेकी

मी नमाज पठण करत नाही. मी इफ्तारमध्ये जाते, जेथे सर्व धर्मातील लोक मिळून जातात. त्याने काही अडचण होतेय का? मी जेव्हा दुर्गापूजेसाठी जाते तेव्हा कोणीच काही बोलत नाही. आपल्या देशात सर्वधर्माचे लोक राहतात, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

.

हेही वाचा: 'अग्निपथ योजने'त युवकांना कुठला जाॅब...,रोहित पवारांचा मोदी सरकारला सवाल

मी जैन मंदिरातही जाते, तर यात काय चुकीचे आहे. तुम्ही जेव्हा एक धर्म मानता, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या धर्माला शिव्या द्याव्यात, बॅनर्जी या उत्तर २४ परगणा येथे बोलत होत्या. बुधवारी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांची बैठक दिल्लीत बोलवली होती. या प्रसंगी आगामी राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. यावेळी देशातील १७ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

Web Title: Mamata Banerjee Attack On Bjp Leaders For Riots In Across The Country

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mamata BanerjeeBjpKolkata
go to top