'ममता बॅनर्जी सद्दाम हुसैनसारख्या'

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मे 2019

- ममता बॅनर्जी वागत आहेत हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे.

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हुकुमशहा सद्दाम हुसैनप्रमाणे वागत आहेत, अशी टीका अभिनेता विवेक ओबेरॉयने आज (बुधवार) केली. तसेच ममता दीदींची 'दीदीगिरी' जास्त दिवस चालणार नाही, असेही ओबेरॉय याने सांगितले. 

तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये कोलकाता येथे काल (मंगळवार) मोठी हाणामारी झाली होती. या हाणामारीनंतर अनेक कार्यकर्त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विवेक ओबेरॉय म्हणाला, दीदींसारखे (ममता) आदरणीय व्यक्तिमत्त्व सद्दाम हुसैनप्रमाणे का वागत आहे, मला कळत नाही. 'खरं तर लोकशाही खतरे में' है अशी मागणी करणाऱ्या ममता दीदींमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. दीदींची ही दीदीगिरी चालणार नाही. 

दरम्यान, पश्चिम बंगालच्या या परिस्थितीवर कलाकारांपैकी विवेक ओबेरॉयने हे वक्तव्य पहिल्यांदा केले आहे. आता ममता बॅनर्जी यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते हेच पाहावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee is Behaving Like Saddam Hussain says Vivek Oberoi