Mamata Banerjee: भाजपचा दृष्टिकोन लज्जास्पद; ममता,भाजप बंगालींना त्रास देत असल्याचा आरोप
West Bengal: ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल, बंगाली भाषकांना 'बांगलादेशी रोहिंग्या' म्हणत असल्याचा आरोप. बंगाली मजुरांना राज्याबाहेर अटक करून डांबले जात असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा.
कोलकता : ‘‘भाजप सर्वच बंगाली भाषिकांना ‘बांगलादेशी रोहिंग्या’ म्हणते. ‘रोहिंग्या’ म्यानमारमध्ये राहतात. येथे पश्चिम बंगालमधील सर्व नागरिकांकडे वैध ओळखपत्रे आहेत. जे मजूर बंगालबाहेर गेले आहेत, त्यांना कौशल्य असल्यामुळेच कामे मिळाली आहेत.