
देशात 'फूट पाडा अन् राज्य करा' चे धोरण : ममता बॅनर्जी
कोलकाता : देशात आज ज्या पद्धतीने 'फूट पाडा आणि राज्य करा' हे धोरण राबवले जात आहे ते योग्य नसून, एकटेपणाचे राजकारण सुरू आहे. ते योग्य नाही, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी काही लोक हिंदू (Hindu) आणि मुस्लमानांना (Muslim) वेगळे करण्याविषयी बोलत आहेत. मात्र, तुम्ही त्यांचे ऐकू नका असे त्यांनी यावेळी सांगितले. ईदनिमित्त (EID) आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. (Mamta Banerjee Attack On Modi Government)
हेही वाचा: LIC IPO : 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी'; मग किंमत कमी का? : सुरजेवाला
केंद्र सरकारवर निशाणा साधत ममता म्हणाल्या की, 'अच्छे दिन आएंगे, परंतु हे खोटे अच्छे दिन असणार नाहीत असे म्हणत, अच्छे दिन येणार, सगळ्यांच्या सोबत येणार. सर्वांना एकत्र राहायचे आहे, एकत्र काम करायचे असून, दिशाभूल करणाऱ्या आणि हिंदू-मुस्लमानांना वेगळे करणाऱ्यांचे ऐकू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
हेही वाचा: काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्यानंतर पीकेंबाबत ममता बॅनर्जी विधान; म्हणाल्या...
देशातील परिस्थिती योग्य नाही. फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण आणि देशात सुरू असलेले वेगळेपणाचे राजकारण योग्य नाही. मात्र, तुम्ही घाबरू नका आणि लढत राहा. मी, माझा पक्ष किंवा माझे सरकार असे काहीही करणार नाही, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे आश्वासनही यावेळी ममता यांनी दिले.
Web Title: Mamata Banerjee Eid Divide And Rule Not Good For Country
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..