Kolkata News : शहाजहाँचा ताबा देण्यास नकार; ममता सरकारने उच्च न्यायालयाचे आदेश झुगारले

संदेशखालीमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा तपास कोलकता उच्च न्यायालयाने आज राज्य पोलिसांकडून काढून घेत केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविला आहे.
Mamata Banerjee government refuses to hand over Shah Jahan's tomb defies high court order
Mamata Banerjee government refuses to hand over Shah Jahan's tomb defies high court orderSakal

कोलकता : संदेशखालीमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा तपास कोलकता उच्च न्यायालयाने आज राज्य पोलिसांकडून काढून घेत केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविला आहे.

सध्या अटकेत असलेला हिंसाचाराचा सूत्रधार शहाजहाँ शेख याचा ताबा केंद्रीय तपास संस्थेकडे सोपविण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. पण ममतांनी त्याचा ताबा केंद्रीय तपास संस्थकडे सोपविण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्य न्यायाधीश टी.एस. शिवागनानम यांच्या पीठाने आमचे हे आदेश मंगळवार साडेचार वाजल्यापासून लागू होतील, असे म्हटले आहे.

तत्पूर्वी उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठानेच ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांवरील हल्ल्याचा तपास हा संयुक्त विशेष पथकाकडे सोपविण्यात यावा, असे निर्देश दिले होते. या पथकामध्ये ‘सीबीआय’ आणि राज्य पोलिस दलांतील अधिकाऱ्यांचा समावेश असेल, असेही सांगण्यात आले होते. दरम्यान आज बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे याचिकेवर तातडीने सुनावणीची विनंती केली होती पण ती फेटाळून लावण्यात आली.

राष्ट्रपतीची राजवटीची विनंती

संदेशखालीतील हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना अहवाल सादर केला तसेच राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. मध्यंतरी आयोगाच्या पथकाने संदेशखालीला भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com