esakal | West Bengal Assembly Election: ममतांवर हल्ला करणाऱ्यांविषयी सस्पेन्स वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata_Banerjee

ममता नंदीग्राममधून निवडणूक लढवत असून त्यांना भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचे आव्हान आहे.

West Bengal Assembly Election: ममतांवर हल्ला करणाऱ्यांविषयी सस्पेन्स वाढला

sakal_logo
By
पीटीआय

West Bengal Assembly Election 2021: कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तृणमूल काँग्रेसने याच घटनेचे भांडवल करायला सुरुवात केली असताना भाजपनेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारने याबाबत निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला होता पण त्यामध्येही या घटनेची जुजबी माहिती देण्यात आल्याने आयोगाने नाराजी व्यक्ती केली आहे. मुख्य सचिव अल्पान बंदोपाध्याय यांनी याबाबत सविस्तर निवेदन सादर करावे, असे निर्देश निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

ही घटना नेमकी कशी घडली आणि त्यामागे नेमके कोण सूत्रधार होते याबाबत सविस्तर माहिती द्या, असे निर्देश आयोगाने मुख्य सचिवांना दिले आहेत. ममता बॅनर्जींवर हल्ला करण्यामागे नेमका कुणाचा हात असू शकतो, याबाबत देखील माहिती सादर करा असेही या निर्देशांत म्हटले आहे. 

खूशखबर ! 60 वर्षांवरील व्यक्तींना मोदी सरकार देणार महिन्याला 3000 रुपये, अशी करा नोंदणी​

राज्य सरकारने आयोगाला सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, ‘‘ममतांवर शुक्रवारी सायंकाळी हल्ला झाला तेव्हा प्रचंड गर्दी होती.’’ ज्या चार ते पाच व्यक्तींनी ममतांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे, त्यांचा या अहवालामध्ये कोठेही स्पष्ट उल्लेख दिसत नाही. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम येथील बिरूलिया बाजार परिसरात सायंकाळी ममतांवर हा कथित हल्ला करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला होता.

शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग; दिल्ली-डेहराडून दरम्यान घडली घटना​

हल्ला करणाऱ्यांविषयी सस्पेन्स 
ममता नंदीग्राममधून निवडणूक लढवत असून त्यांना भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचे आव्हान आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून महत्त्वाच्या राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. यादरम्यान ममतांवर झालेला हल्ला हा अपघात होता की कट याबाबत अजून काही स्पष्ट झाले नाही. ममतांवर हल्ला करणाऱ्या त्या चार-पाच व्यक्ती अहवालातून गायब झाल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी ममतांवर झालेल्या हल्ल्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला, पण त्यामध्ये चार-पाच जणांनी हल्ला केल्याच्या कोणत्याही माहितीचा उल्लेख करण्यात आलेल नाहीय. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ममतांवर शुक्रवारी सायंकाळी हल्ला झाला तेव्हा प्रचंड गर्दी होती, फक्त एवढाच उल्लेख करण्यात आला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image